अवीट ऋणानुबंध विदर्भाचे - पुण्यनगरीशी

विदर्भ आणि पुण्याचे ऐतिहासिक - सांस्कृतिक ऋणानुबंध बरेच जुने आहेत.

सुमरे ४०० वर्षांपूर्वी विदर्भवासी जिजाबाई, विदर्भातील सिंदखेड राजा येथून शहाजी महाराजांची पत्नी म्हणून पुण्यात आली आणि पुणे जहागिरीत तिने पुत्राच्या हस्ते सोन्याचा नांगर चालविला. ती मूळ विदर्भकन्या जिजाबाई म्हणजे महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवराय़ांची माता! ‘पहिली विदर्भवासी - पुणे निवासी’.

त्यानंतर अनेक विदर्भवासी पुण्यात येऊन स्थायिक झाले आणि आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून त्यांनी पुण्याच्या विकासाला गतिमान केले. व्यवसाय, शिक्षण व नोकरी इत्यादींच्या निमित्ताने बरेच विदर्भवासी आज पुण्यात स्थायिक झाले आहेत. अशांची संघटना बांधणी दिनांक ६ जून २००६ रोजी काही विदर्भवासीयांनी केली.

या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने ’विदर्भवासी - पुणे निवासी’ ह्या संस्थेची आता रीतसर नोंदणी करण्यात आली आहे.

आगामी कार्यक्रम

Free Medical Checkup Camp

27th November 2016 from 9.30 a.m. to 6.00 p.m.

Venue: Treehouse School,
Dudhane Vasti, Warje
Pune
Contact : Mrs. Maya Tulpule on 9923709210


Vivah Melawa

4th December 2016 from 5.00 p.m. to 8.00 p.m.

Venue: Scout Ground, S.P. College
(Near Udyan Prasad Karyalaya)
Pune
Contact : Mr. Marde on 9421051914

 

व्यापक उद्दीष्टे

पुण्यात स्थायिक झालेल्या किंवा शिक्षण - नोकरीसाठी आलेल्या सर्व वैदर्भीय मंडळींचा सर्वांगीण विकास करणे.

वैदर्भीयांसह सर्वच पुणेवासियांचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध करणे.

पुण्यात नव्याने आलेल्या तरुण-तरुणी तसेच आबाल-वृद्धांच्या निवास, वसतिगृहे, शैक्षणिक, आरोग्यसेवा इत्यादी गरजांची पूर्तता करणे.

सांस्कृतिक कर्यक्रम - स्नेहसंमेलन, कला, चर्चा, क्रिडा, संगीत, प्रबोधनपर व्याख्याने आयोजित करून कलागुणांना वाव देणे.

विदर्भाचा इतिहास, संस्कृती, परंपरा, चालीरीतींचे जतन करून त्याबद्दलची जाण नव्या पिढीला करून देणे.

 
Photo of Mr. Digambar Joshi

संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. दिगंबरपंत जोशी एका कार्यक्रमात भाषण करताना.

Photo of Mr. Mukund Mule

विदर्भाची शान वाढवणाऱ्या कोटमॅक चे श्री. मुकुंद मुळे, पुण्याचे डि. सी. पी. श्री. सतिश खंदारे, समिक्षक आणि लेखक श्री. डि. बी. कुलकर्णी यांचा सत्कार.

Photo of Suvarna Mategaonkar

सुवर्णा माटेगावकर यांची सुगम संगीताची मैफल

 

Valid HTML 4.0 Transitional | Website Designed by : JoyTree Software